अर्थसंकल्पातून माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना वाहिली आदरांजली

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारचा यंदाचा पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर होत आहे. दरम्यान, देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पाचे वाचन करत आहेत. त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा देशातील जनतेच्या आकांक्षेचा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. तसेच सरकारचे काम हे केवळ देशातील जनतेची सेवा करणे हेच असल्याचे म्हटले.

दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना सरकारकडून दिवंगत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना आदरांजली वाहण्यात आली.देशात अनेक नवनवीन आणि यशस्वी योजनांची अंमलबजावणी ही माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या कार्यकाळात झाली याची आठवण यावेळी सीतारमण यांनी करून दिली. तसेच अरूण जेटली हे जीएसटीचे मुख्य शिल्पकार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.