नवी दिल्ली – इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड विरुद्ध आयर्लंड असा एकमेव कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट याने 56 धावा करत कसोटी क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा पार करत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अशी कामगिरी करणारा जो रूट जगातला दुसरा इंग्लिश फलंदाज ठरला आहे.
या आधी इंग्लंड चा माजी खेळाडू अॅलिस्टर कूकने हा विक्रम केला होता. तसेच 11,000 धावांचा टप्पा पार करत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला आहे. जो रूट असा विक्रम करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने वयाच्या 32 वर्षे 154 दिवसांत हा टप्पा पार केला.
सचिन तेंडुलकरने वयाच्या 34 वर्षे 95 दिवसांत तर कूकने वयाच्या 31 वर्षे 357 दिवसांत कसोटीमध्ये 11,000 धावांचा आकडा गाठला होता. तसेच यांच्याव्यतिरिक्त कुमार संगकारा, ब्रायन लारा, रिकी पाँटिंग, राहुल द्रविड, जॅक कॅलिस, महेला जयवर्धने, शिवनारायण चंद्रपॉल आणि अॅलन बॉर्डर यांनी देखील कसोटी क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11,000 धावा करणारा खेळाडू –
1) कुमार संगकारा – 208 सामने
2) ब्रायन लारा – 213 सामने
3) रिकी पाँटिंग – 222 सामने
4) सचिन तेंडुलकर – 223 सामने
5) राहुल द्रविड – 234 सामने
6) जॅक कॅलिस – 234 सामने
7) महिला जयवर्धने 237 सामने
8) जो रूट – 238 सामने
9) अॅलिस्टर कूक – 252 सामने
10) शिवनारायण चंद्रपॉल – 256 सामने
11) अॅलन बॉर्डर – 259 सामने