‘EVM’ छेडछाडीच्या आरोपांवर माजी निवडणूक आयुक्त म्हणतात…

नवी दिल्ली – समाज माध्यमांवर निवडणुकांमध्ये वापरलेली ईव्हीएम ठेवण्यासाठीच्या स्ट्रॉंग रूममध्ये संशयित हालचाली होत असल्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी एव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा जोरदार आरोप केला होता. मात्र आता ईव्हीएम छेडछाड प्रकरणाबाबत माजी निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी आपली भूमिका मांडली आहे. रावत यांच्या मते ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये फेरफार करणे शक्य नाही कारण याबाबतचे नियम अतिशय कठोर आहेत.

ते म्हणतात, “ईव्हीएम मशिन्सची छेडछाड होऊ शकत नाही. ईव्हीएम ठेवण्यात येणारी स्ट्रॉंग रूम जेव्हा उघडायची असते त्या वेळी ईव्हीएम सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. स्ट्रॉंग रूम उघडताना सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना तेथे बोलवण्यात येते, मशीन त्यांच्या उपस्थितीतच घेतल्या जातात, तसेच त्यांच्यासमोर ‘मॉक पोल’ देखील घेण्यात येतात. मतदान केंद्रावर मतदानासाठी ईव्हीएम तयार करताना, पुन्हा एकदा एक ‘मॉक पोल’ घेण्यात येतो. यामध्ये सर्व पक्षांच्या मतदान प्रतिनिधींना मतदान करण्यास सांगितले जाते आणि नंतर ते त्यांच्यासमोरच मोजले देखील जाते. या सर्व व्यवस्थेमुळे ईव्हीएमची छेडछाड करता येत नाही हे सुनिश्चित होते.”   .

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.