दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन झाल्याचं वृत्त नुकतंच हाती येतंय. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच दीर्घआजाराने निधन झाले आहे. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. दिल्लीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्या ८१ वर्षांच्या होत्या.

प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे आज सकाळीच त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली.

दरम्यान, दिल्लीचं दिर्घकाळ मुख्यमंत्रीपद त्यांनी भुषवलं होतं. त्यांनी तब्बल १५ वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा भार सांभाळत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.