कोलकाता – टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना ऱ्हदयविकाराच्या तीव्र धक्यानंतर कोलकातामधील वुडलॅंड्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर अॅंजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अशी माहिती वुडलॅंड्स रुग्णालयाच्या डाॅ. रूपाली बासु यांनी दिली आहे.
गांगुलीवर अॅंजियोप्लास्टी करण्यासाठी चार डाॅक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली असून डाॅ. सरोज मंडल यांच्या नेतृत्वात चार डाॅक्टर अॅंजियोप्लास्टी करणार आहेत.
जीममध्ये वर्कआऊट करत असताना गांगुलीला त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांनी वुडलॅंड्स रूग्णालयात तपासणी केली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान, गांगुली रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच अनेकजण ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. तसेच अनेकांनी ट्विट करून त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली. वीरेंद्र सेहवाग, बीसीसीाय अध्यक्ष जय शाह, ममता बॅनर्जी यांसह सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.