पुणे – माजी नगरसेवकाच्या दोन मुलांसह चौघांना सक्तमजुरी

पुणे – पूर्वी झालेल्या भांडणातून चाकूचा धाक दाखवून लाकडी दांडक्‍याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणात माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांच्या दोन मुलांसह चौघांना एक वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी आठ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भारत गायकवाड यांनी हा आदेश दिला आहे.

तुषार तानाजी निम्हण (39), चेतन तानाजी निम्हण (31, दोघेही रा. 1/12, ताई आर्केड, पाषाण, पुणे), सुशांत बाळासाहेब निम्हण (25, रा. आथर्वगंगा सोसायटी, पाषाण) आणि मुन्ना दिग्विजय निम्हण (24, रा. घर नंबर 220, सर्वे न. 1 पाषाण, पुणे) अशी शिक्षा झालेल्या चौघांची नावे आहेत. खटल्यात सरकारी वकील व्ही. व्ही. पाटील आणि ज्योती लक्‍का यांनी काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दि. 12 जुलै 2015 रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांच्या मित्राने पाषाण येथील पूनम बेकरीतून काही वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर रिक्षातून जात असताना दुचाकीवर आलेल्या आरोपींनी मागील भांडणाच्या रागातून चाकूचा धाक दाखवून लाकडी दांडक्‍याने मारहाण करून एकाचा हात फ्रॅक्‍चर केला. तसेच रिक्षाची काचही फोडली. त्यानंतर जखमींना जवळील रुग्णालयात हजर केले. खटल्यात सरकारी वकील लक्‍का यांनी चौघांना शिक्षा देण्याची मागणी केली. दरम्यान, न्यायालयाने सरकारी पुरावे ग्राह्य धरून दंडाच्या रकमेपैकी प्रत्येकी 8 हजार रुपये आणि 4 हजार रुपये अनुक्रमे फिर्यादी संजय तुकाराम जगताप आणि गणेश बबन सुपेकर यांना देण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)