Pune Crime | माजी नगरसेविका नीता राजपूत यांच्या पतीच्या आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

पुणे,दि.9 कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका नीता राजपूत यांचे पती जयंत राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी ( दि.8 ) चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला .

राजेंद्र दत्तात्रय मारणे (45, रा. मोहननगर, धनकवडी), डॉ. विवेक रसिकराज वायसे (44 , रा. बावधन), बापू सुंदर मोरे (40 , रा. सिंहगड रोड), बापूराव विनायक पवार (34 , रा. भेकराईनगर, हडपसर) ही गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निता जयंत राजपूत (55 , रा. सदाशिव पेठ) यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यांचे पती जयंत यांनी विधी महाविद्यालय रस्त्यावरील कार्यालयात 28 ऑक्‍टोंबर आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये संशयित आरोपीच्या नावाचा उल्लेख आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

मारणे हे टेम्पोचालक असून मोरे व पवार खासगी कंपनीचे रिकव्हरी एजंट आहेत. त्यांनी धमक्‍या दिल्यामुळे राजपूत यांनी आत्महत्या केली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव अधिक तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.