कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार ‘संजय सिंह’ यांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अमेठीतील नेते व राज्यसभा सदस्य संजयसिंह यांनी आज भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. संजयसिंह यांच्यासह त्यांच्या पत्नी व कॉंग्रेस नेत्या अमितासिंह यांनी सुध्दा भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

कालच संजयसिंह यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तसेच कॉंग्रेस पक्षात संवादाचा अभाव असून कोणत्याही विषयावर पक्षात स्पष्टता नाही त्यामुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

कॉंग्रेसने त्यांना आसामातून राज्यसभेवर पाठवले होते. त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला असून अध्यक्ष नायडू यांनी तो स्वीकारला आहे. संजयसिंह हे तेथील स्थानिक राजघराण्यातील नेते असून अमेठीत त्यांचे मोठे जनसमर्थन आहे. त्यामुळे कॉंग्रेसला बसलेला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. तथापी संजय सिंह यांनी या आधीही भाजप मध्ये काम केले असून सन 1990 साली ते भाजपच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून आले होते. अलिकडेच त्यांनी सुलतानपुर मतदार संघातून कॉंग्रेसच्या तिकीटावर मनेका गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

तथापी ते मोठ्या फरकाने पराभूत झाले होते. त्यांच्या पत्नी अमिता सिंह या अमेठीतून दोन वेळा उत्तरप्रदेश विधानसभेवर निवडून आल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)