नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसेला पिस्तुल पुरवणारा काँग्रेसचा माजी कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक दावा भाजप खासदा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
त्यांनी या प्रकरणी दोन ट्विट केले आहे. तसेच महात्मा गांधी यांचा हत्येची नव्याने चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली. महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्याशी मृतदेहाचं शवविच्छेदन का केले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
One more fact, and so far unknown to the general public, regarding Gandhiji assassination is that Accused Badge, who gave the revolver to Godse, made a sworn statement in court that he was a Congressman before joining Hindu Mahasabha!!
— Subramanian Swamy (@Swamy39) February 17, 2020
तसेच बडगे नावाचा हिंदू महासभेत रुजू होण्यापूर्वी काँग्रेसचा कार्यकर्ता होता. त्यानेच गोडसेला बंदुक पुरवली होती. न्यायालयात त्याने साक्ष दिल्याचेही सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी गांधी हत्येबद्दल चार प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहेत.
1st question: Why no post mortem or autopsy on Gandhiji's body? 2nd : Why Abha and Manu as direct eyewitnesses not questioned in court? 3rd: How many empty chambers in Godse's revolver? Italian revolver "untraceable"!! Why? We need to re-open the case
— Subramanian Swamy (@Swamy39) February 16, 2020
महात्मा गांधींच्या मृतदेहाचं शवविच्छेदन का करण्यात आलं नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.
तसेच आभा आणि मनू या दोघीही साक्षीदार असताना त्यांनी साक्ष न्यायालयात का नोंदवली नाही? नथुराम गोडसेकडे यांच्याकडे बंदुकीतले चेंबर तपासले नाही?
इटालियन बनावटीची हि बंदुक नथुरामकडे आली कुठून? नंतर त्या बंदुकीचं काय झालं?
सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या या ट्विटमुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.