माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन

पुणे – काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय ८८) यांचे  आज पहाटे २.१५ वाजता निधन झालं आहे. आज निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी करोनावर मातदेखील केली होती. पण आज सकाळी किडनीच्या विकाराने त्यांचे निधन झाले.

शिवाजीराव पाटील-निलंगेकर १९८५ ते८६ दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदही त्यांनी भूषवंलं आहे. काही काळ ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, एक मुलगी, नातू आणि पणतू असा मोठा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.