माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

न्यायालयाने विधानसभा निवडणूक लढवण्यास परवानगी नाकारली

नवी दिल्ली : झारखंडचे झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. कारण त्यांना अपात्र ठरवणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली त्यात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी पुर्ण होईपर्यंत झारखंडच्या विधानसभा निवडणुक न लढण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, त्यांच्या अपात्रतेचा कार्यकाळ अजून संपला नसून त्याला आणखी एक वर्ष कमी असल्याचेही सांगण्यात येत आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा राज्यातील विधानसभा निवडणुका लढवू शकणार नाहीत. त्यांच्या अपात्रतेला अजून एक वर्ष बाकी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी करत असताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणुक आयोगाला देखील नोटीस बजावली आहे. कारण न्यायालयाने आयोगाला या प्रकरणात याचिका दाखल करण्यात उशिर झाला असून या विलंबामुळे या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, झारखंडमध्ये येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत.

विशेष म्हणजे सप्टेंबर 2017 मध्ये निवडणूक आयोगाने 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कोडाला खर्चाची योग्य माहिती न दिल्याबद्दल दोषी ठरवले. त्यानंतर निवडणूक लढविण्यासाठी कोडावर तीन वर्षाची बंदी घालण्यात आली. प्रकरण 2009 च्या लोकसभा निवडणुकीचे आहे यावेळी त्यांनी चाईबासा जागेवर निवडणूक जिंकली होती.

कोडा यांनी निवडणूक खर्चाची अचूक माहिती दिली नसल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या होत्या. यानंतर, आयोगाने कोडा यांना नोटीस बजावली आहे की, योग्य तपशील न दिल्यास आपण अपात्र का होऊ नये, अशी विचारणा केली. आयोगाच्या म्हणण्यानुसार कोडाची किंमत 18 लाख 92 हजार 3,53 रुपये होती, तर त्यांनी यात कपात करून ती कमी केली होती. 49 पानांच्या आदेशात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की कोडा यांनी सादर केलेला तपशील चुकीचा होता. त्यानुसारच त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.