माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह अत्यवस्थ

लखनौ  – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांना कृत्रीम श्‍वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले असल्याची माहिती संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेने दिली आहे.

कल्याणसिंह यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मंगळवारपासून कृत्रीम श्‍वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीकडे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे, असे रुग्णालयाच्या निवेदनात म्हटले आहे. त्यांच्यावर हृदरोग, मुत्राशयविकार तज्ज्ञ, मेंदुविकार तज्ज्ञ आणि अंतस्त्राव तज्ज्ञ त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

89 वर्षीय कल्याणसिंह यांना चार जुलै रोजी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यापुर्वी त्यांच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.