गुरुग्राम : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रमण सिंह यांनी काल रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रमण सिंह गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत होते. दोन दिवसांपूर्वीच 22 जुलै रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. रमण सिंह हे डिसेंबर 2003 पासून डिसेंबर 2018 पर्यंत छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदावर होते.