नवी दिल्ली – सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना करोना झाला होता. त्यामुळे त्यातच त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी रात्री त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि आज पहाटेच साडेचारच्या सुमाराला त्यांचे निधन झाले.
सिन्हा हे 1974 च्या बॅचचे अधिकारी आहेत ते बिहार केडरचे होते. ते सन 2012 मध्ये सीबीआयचे प्रमुख म्हणून नेमले गेले होते. त्या आधी त्यांनी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, या निमलष्करी दलांचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले होते. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनीस्ट्रेशनमधून एमफिल ही पदवीही मिळवली होती. ते स्वतः विविध मासिके व नियतकालिकांमधून नियमित लिखाणही करीत असत. पोलीस सेवेत असताना त्यांना राष्ट्रपतिपदकासह अन्यही पारितोषिके मिळाली आहेत.