जोहान्सबर्ग – भारताविरूद्ध होणाऱ्या टी-20 सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधारपदी क्विन्टॉन डीकॉकची निवड करण्यात आली असून या संघात माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसला स्थान देण्यात आलेले नाही. मात्र प्लेसिसची कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे प्रभारी संचालक कॉरी व्हानझील यांनी हे संघ जाहीर केले. टी-20 च्या तीन सामन्यांच्या मालिकेस 15 सप्टेंबर रोजी प्रारंभ होणार आहे. त्यानंतर तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. द्रुतगती गोलंदाज डेल स्टेन याला मात्र या दौऱ्यासाठी आफ्रिकेच्या संघात स्थान मिळालेले नाही. त्याने कसोटीमधून निवृत्ती घेतली होती व टी-20 सामन्यातील सहभाग कायम ठेवला होता. संघात स्थान मिळाल्यामुळे त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दक्षिण आफ्रिका टी-20 संघ – क्विन्टॉन डीकॉक (कर्णधार), रासी व्हानडर दुसेन (उपकर्णधार), तेम्बा बावुमा, ज्युनिअर डेला, बियॉर्न फोर्टुन, ब्युअरन हेड्रींक्स, डेव्हिड मिलर, एनरीच नोर्टजे, अँडील फेहलुक्वायो, द्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, ताबरेझ शामसी, जॉन जॉन स्मुट्स.
कसोटी संघ – फाफ डू प्लेसिस (कर्णधार), तेम्बा बावुमा (उपकर्णधार), थेनुईस ब्रुईन, क्विन्टॉन डीकॉक, डीन एल्गार, झुबीार हामझा, केशव महाराज, एडन मर्कराम, सेनुरान मुथुसामी, लुंगी एनगिडी, एनरीच नोर्टजे,व्हर्नान फिलॅंडर, डेन पिएड्ट, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.