असेन्शिओन (पॅराग्वे) :- ब्राझीलचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू रोनाल्डीन्हो याची मंगळवारी नजरकैदेतून सुटका करण्यात आल्याचे पॅराग्वे सरकारने सांगितले आहे. अवैध पारपत्राद्वारे देशात दाखल झालेल्या रोनाल्डीन्होला प्रशासनाने घरातच स्थानबद्ध केले होते.
अवैध पारपत्र बाळगल्याप्रकरणी रोनाल्डीन्होला त्याच्या भाऊ रॉबर्टो याला येथील न्यायालयाने दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, ब्राझील सरकारने केलेल्या विनंतीनंतर या दोघांना 2 लाख अमेरिकन डॉलर्सच्या दंड भरण्याची सुचना करत त्यांची सुटका केली.