बिजू जनता दलाचे माजी खासदार ‘जय पांडा’ यांचा भाजपात प्रवेश 

नवी दिल्ली – बिजू जनता दलाचे माजी खासदार बैजयंत जय पांडा यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, जानेवारी महिन्यात जय पांडा यांना पक्ष विरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरुन बिजू जनता दल पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांच्याकडे पाठवला होता.

जय पांडा यांना ज्यावेळी पक्ष विरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरुन निलंबित करण्यात आले होते, तेव्हापाससून ते बिजू जनता दल सोडणार असल्याची चर्चा होती, मात्र आज त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)