IAS Suspended: २४१ कोटी रुपयांच्या कथित जमीन अधिग्रहण भरपाई घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना राज्य शासनाने निलंबित केले आहे. महसूल विभागाने याबाबतचा आदेश जारी केला असून अटकेच्या तारखेपासूनच हे निलंबन लागू करण्यात आले आहे. २०१३ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले अविनाश पाठक (वय ५५) यांना बीड पोलिसांच्या विशेष तपास पथकाने ७ मे रोजी लातूर येथून अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. खोटे भरपाई आदेश काढले – (IAS Suspended) जमीन अधिग्रहण भरपाई घोटाळ्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अविनाश पाठक यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाठक यांची बीडमधून बदली झाल्यानंतरही त्यांच्या नावाचा, पदाचा आणि बनावट स्वाक्षरींचा वापर करून खोटे भरपाई आदेश काढण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. हेही वाचा – पेट्रोल-डिझेलबाबत CM फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश लातूरचे रहिवासी असलेले पाठक यांनी कोविड काळात लातूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते. तसेच धाराशिव जिल्ह्यात भूमी संपादन अधिकारी म्हणूनही त्यांनी सेवा बजावली होती. विविध कलमांनुसार गुन्हा – (IAS Suspended) या प्रकरणात त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे, शासकीय कर्मचाऱ्याने कायद्याचे उल्लंघन करणे, धमकी देणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.