नवी दिल्ली – इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 ऑगस्टपासून ऍशेस मालिकेला सुरवात होणार आहे. यंदाच्या ऍशेस मालिकेचं आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे इंग्लंडला आपल्या अनुकूल परिस्थितीचा फायदा मिळू शकतो. गेल्या वेळेस इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाने आपल्या भूमीत 0-4 ने पराभूत केले होते. त्या वेळेस ऍशेस बेन स्टोक्सची निवड न केल्याने इंग्लंडला मोठा फटका बसला होता. मात्र यावेळेस बेन स्टोक्सची संघात निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत बेन स्टोक्स याने शानदार कामगिरी केली होती व आपल्या संघाला विश्वविजेता करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. आगामी ऍशेस मालिकेत सुध्दा तो शानदार कामगिरी करेल यात शंका नाही. त्यामुळे आगामी ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या मार्गात बेन स्टोक्स हाच मुख्य अडथळा असणार आहे, असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णाधार रिकी पॉंन्टिंग याने म्हटले आहे.
याबाबत बोलताना रिकी पॉंन्टिंग म्हणाला की, ‘आगामी ऍशेस मालिकेत आमच्या ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या मार्गात बेन स्टोक्स हाच मुख्य अडथळा असणार आहे. त्याच्याकडे सामन्यास कलाटणी देण्याची क्षमता आहे. आमच्या खेळाडूंनी त्याच्या खेळाचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे नाही तर आमच्या संघास ऍशेस मिळविणे कठीण जाईल.