माजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या

हैदराबाद – आंध्र प्रदेश राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते 72 वर्षांचे होते. या घटनेमुळे आंध्र प्रदेशात खळबळ उडाली आहे.

राज्यातील विरोधीपक्ष तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) ते वरिष्ठ नेते होते. या घटनेनंतर त्यांना तत्काळ बसावटकम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. कोडेला यांच्या निधनावर मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

2014 मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन नव्या तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कोडेला हे आंध्र प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष बनले होते. ते नारसोराओपेट मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. एकदा ते सत्तेनापल्ली येथूनही आमदार झाले होते. त्यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा आणि पंचायत राज मंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला होता.

1983 मध्ये ते टीडीपीमध्ये सहभागी झाले. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता, गुंटूर येथील मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेत ते डॉक्‍टर बनले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)