नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफ करा

श्रीगोंदा – अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कधीही न भरुन येणारे असे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक मुलांसमोर शैक्षणिक शुल्क भरायची कशी, असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शाळकरी मुलांची मासिक प्रवास एसटी पास शुल्क व शैक्षणिक शुल्क माफ करावे, शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी तहसीलदारांना दिले.

याप्रसंगी प्रमोद राजेंद्र म्हस्के, आदिल शेख, नागेश गांगर्डे, ऋषी पवार, केतन बाबर, मुकुंद चिखलठाणे, मनोहर सरोदे, अनिल बाबर, कुणाल घोडके, मयूर नलगे, अजय गाडे आदी विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी प्रा. कानिफनाथ उगले यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांची व्यथा प्रशासनासमोर मांडली.विद्यार्थ्यांच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांच्या वतीने डी. एन. साळुंके यांनी स्वीकारले.

Leave A Reply

Your email address will not be published.