Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या मेळाव्यात विविध विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींकडे एक विनंती केली आहे. मला खून माफ करा. ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला त्यांचा मला खून करायचे आहे असे मिश्कील वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. दरवेळी येऊन फोटो काढणे हा एक आजार आहे. कुठे तरी या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत असं मला वाटतं, असे राज ठाकरे यांनी गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात म्हंटले आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
“राष्ट्रपतींना माझी विनंती आहे. मला एक खून माफ करा, मला ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला मला त्याचा खून करायचा. सर्वांना फोटो देणं शक्य होतं नाही. काही पदाधिकारी वर्धापनाला फोटो काढतात, त्यांचा वाढदिवस असला तरी फोटो, माझा वाढदिवस असला तरी फोटो, बरं ज्यांचा फोटो नाही त्यांचं समजू शकतो, पण दरवर्षी तेच फोटो काढतात. हा आजार आहे. या गोष्टी थांबल्या पाहिजे. मला त्रास होतो. अनेकांना त्रास होतो. पण त्यामुळे मी महाराष्ट्र सैनिकांना भेटू शकलो नाही. पुढच्यावेळी जास्तीत जास्त भेटेन,” असे आश्वासन देखील राज ठाकरे यांनी दिले.
दरम्यान, राजठाकरेंनी मेळाव्यात रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक वेळा त्यांना मी भेटलो. अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकलो. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. रतन टाटा हे देशाचे मानबिंदू होते. रतन टाटांकडून जगाला अनेक गोष्टी मिळाल्या. मी त्यांना भेटू शकलो, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान मानतो. ” Raj Thackeray |
…मग राजकारणी सभ्य का आवडत नाही?
रतन टाटांसारखे सरळ, सभ्य लोक तुम्हाला आवडतात मग राजकारणी सभ्य का आवडत नाहीत? असा सवालही राज ठाकरेंनी केला. आमदार फोडाफोडी करायची आणि राजकारण तापवायचं. एखाद्या पक्षासोबत निवडणुका लढवायच्या आणि परत दुसऱ्या पक्षात जायचं आणि सत्तेमध्ये बसायचं. हेच गेल्या पाच वर्षात आपण बघत आहोत. मग नक्की तुम्हाला आवडते काय? आज जर महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बर्बाद झाला म्हणून समजा,” असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. Raj Thackeray |
तसेच त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केले. लाडकी बहीण योजना आणली आणि पैसे वाटतं सुरू आहे. पण कोणी मागितले होते पैसे? पुढच्या महिन्यापर्यंत पैसे येणार नाही. महिलांना सक्षम बनवा त्यांना काम द्या, त्यांना पैसे कमवू द्या, फुकट कसले पैसे देता?,” असेही राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा :