वनसेवा मुख्य परीक्षा मुलाखतीच्या तारखा जाहीर

पुणे(प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या वनसेवा मुख्य परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी होत होती. अखेर मंगळवारी आयोगाने पात्र 322 उमेदवारांच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या.

करोनामुळे या मुलाखती रखडल्या होत्या. मात्र, यूपीएससीने नागरी परीक्षांचा मुलाखतीचे सर्व वेळापत्रक जाहीर केले. मात्र, एमपीएससीने घेतलेल्या परीक्षांचा मुलाखतीचा कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही. त्या पार्श्‍वभूमीवर पात्र उमेदवारांकडून मुलाखतीच्या तारखा जाहीर करण्याची मागणी होत होती. त्यानंतर आयोगाने मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करून उमेदवारांना दिलासा दिला.

पुणे येथे 20 ते 24 जुलै, औरंगाबाद येथे 27 व 28 जुलै, नाशिक येथे 30 व 31 जुलै, मुंबई येथे 4 ऑगस्ट आणि नागपूर येथे 6 व 7 ऑगस्ट रोजी मुलाखती होणार आहेत. सध्या करोनाचा प्रादुर्भाव असल्याने उमेदवारांनी मुलाखतीस येताना आवश्‍यक ती काळजी घेण्यासाठीच्या सूचनाही आयोगाने उमेदवारांना पाठविलेल्या मुलाखत पत्रात दिल्या आहेत.

दरम्यान, आयोगाने वनसेवा पूर्व परीक्षा 26 मे रोजी, तर मुख्य परीक्षा 15 सप्टेंबर 2019 रोजी घेतली होती. मुख्य परीक्षेचा निकाल 30 जानेवारी 2020 रोजी जाहीर केला. या उमेदवारांसाठी सविस्तर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.