जेरूसलेम – इस्रायलने पुन्हा एकदा सीरियावर एअर स्ट्राईक केला आहे. इस्रायलकडून दमिश्क साउथवर हल्ला करण्यात आला आहे. सीरिया स्टेट माध्यमांनुसार, या हल्ल्यात साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इस्रायलकडून फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा सीरियावर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे.
सीरियाकडून 9 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या अँटी-एअरक्राफ्ट मिसाईल अटॅकला इस्रायलने एअर स्ट्राईक करून उत्तर दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी केलेल्या हल्ल्याचा निशाणा सीरियाचे लष्करीतळ होते. पण या हल्ल्यात कोणतीही जीवतहानी झाली नाही. सीरियाची राजधानी दमिश्क गोलानपासून 60 किलोमीटर दूर आहे. गोलानच्या उंच डोंगरावरून सहजपणे दमिश्क बघता येऊ शकतो. गोलानमध्ये पीकाचे उत्पादन देखील चांगले आहे, त्यामुळे इस्रायलचे गोलानवर अधिक लक्ष आहे.
दरम्यान, इस्रायल आणि सीरियामधील वाद खूप जुना आहे. यामागचे कारण गोलान हाइट्सचा भाग आहे. हा भाग गोलान डोंगर नावाने लोकप्रिय आहे. एकेकाळी या भागावर सीरियाचे वर्चस्व होते. 1967 साली अरब देशांसोबत झालेल्या युद्धानंतर इस्रायलने हा भागावर कब्जा केला. सध्या इस्रायल या भागावर जवळपास 317 मिलियन डॉलर म्हणजेच 23 अब्ज 75 कोटी रुपयांहून अधिक जास्त खर्च करत आहे. या जागेमुळे दोन्ही देशांमध्ये वाद निर्माण झाला आहे.