विदेश वृत्त : बायडेन यांचा 6 लाख कोटी डॉलरच्या अर्थसंकल्पाचा प्रस्ताव

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी येत्या आर्थिक वर्षासाठी सहा ट्रिलियन (6 लाख कोटी) डॉलरचा अर्थसंकल्प प्रस्तावित केला आहे. या अर्थसंकल्पातून देशातील पायाभूत सुविधांची फेरउभारणी आणि चीनशी समर्थपणे स्पर्धा करण्याची क्षमता निर्माण करण्याची बायडेन यांची योजना आहे.

अमेरिकेच्या आर्थिक वर्षाला 1 ऑक्‍टोबरपासून सुरुवात होते. या आर्थिक वर्षात संरक्षण क्षेत्रासाठी 715 अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. हिंद प्रशांत क्षेत्रातील चीनचा विस्तारवाद रोखण्यासाठी 5.09 अब्ज डॉलर खर्च करून पायाभूत सुविधा अधिक बळकट केल्या जाणार आहेत. संरक्षण दलासाठी 85 एफ-35 लढाऊ विमानेही खरेदी केली जाणार आहेत.

अमेरिकेसाठी चीनने सर्वात मोठे दीर्घकालीन आव्हान उभे केले आहे. चीनने अलिकडच्या काळात आपल्या संरक्षण दलात मोठ्या प्रमाणावर सुधारणा आणि आधुनिकीकरण केले आहे. त्यामुळे अमेरिकेलाही आपल्या संरक्षण दलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणे क्रमप्राप्त झाले होते, अशी प्रतिक्रिया पेंटॅगॉनने दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तरतूदीपेक्षा यंदाच्या संरक्षण क्षत्रात 1.6 टक्‍क्‍यांनी वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती.

अमेरिकेच्या या मोठ्या प्रस्तावात हवामान बदलांविरूद्धच्या लढाईत मोठ्या प्रमाणात नवीन सामाजिक कार्यक्रम आणि गुंतवणूकीचा समावेश असेल. या योजनेला कॉंग्रेसची मान्यता आवश्‍यक आहे. मात्र रिपब्लिकन सिनेटचा सदस्य लिंडसे ग्रॅहम यांनी हा प्रस्ताव अत्यंत महागडा असल्याची टीका केली आहे.

या योजनेअंतर्गत, 2013 पर्यंत कर्ज जीडीपीच्या 117 टक्क्‌यांपर्यंत जाईल. हे कर्जाचे प्रमाण दुसऱ्या महायुद्धादरम्यानच्या कर्जाच्या प्रमाणालाही मागे टाकेल, असेही ग्रॅहम म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.