न्यूयॉर्क – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे पाच दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. जानेवारी महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताचा समावेश झाल्यानंतर प्रथमच परराष्ट्र मंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत.
या दौऱ्यात ते संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ ग्युटरेज आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे ज्यो बायडेन यांनी स्वीकारल्यानंतर भारताच्या वरिष्ठ नेत्याने अमेरिकेचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
संयुक्तराष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताची निवड झाल्यानंतर प्रथमच जयशंकर यांचा अमेरिकेचा दौरा होत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अमेरिकेबरोबरच्या द्विपक्षीय संबंधांशी संबंधित डिस्ट्रीक्ट सेंटरच्या मंत्रिमंडळातील सदस्यांसह आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही जयशंकर भेट घेतील. भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक व्यवहार आणि कोविड संबंधित सहकार्यावरील व्यापार मंचांशी त्यांचे दोन संवाद होतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.