कोल्हापुरात विदेशी मद्यसाठा जप्त

कोल्हापूर – राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाने बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला आहे. कागल तालुक्‍यातील मुरगुड आणि भुदरगड तालुक्‍यातील मुधाळ या 2 वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत 2 चारचाकीसह सुमारे 5 लाख 50 हजार रुपयांचे गोवा बनावटीचे विदेशी मद्यसाठा जप्त केला. तर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या संतोष गोविलकर आणि रमेश टीकोडे या दोघांना ताब्यात घेतले.

राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाने शुक्रवारी पहाटे कागल तालुक्‍यातील मुरगुड येथून गोवा बनावटीचे विदेशी मद्य वाहतूक करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले. संतोष गोविलकर असे त्याचे नाव असून यामध्ये सुमारे 3 लाख 55 हजारांचे विदेशी मद्य आणि कारही जप्त केली.

तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने भुदरगड तालुक्‍यातील मुधाळ येथे केलेल्या दुसऱ्या कारवाईत 19 बॉक्‍स गोवा बनावटीच मद्य आणि कार असा सुमारे 1 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाचे निरीक्षक संभाजी बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ पाटील, किशोर नडे, संदीप जानकर यांच्यासह सहकाऱ्यांनी कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.