पुन्हा विदेशी कलाकार

मराठी-हिंदी चित्रपट निर्मात्यांना परदेशी कलाकारांची क्रेझ मोठी आहे. हिंदी चित्रपटांमध्ये यामुळेच अनेकदा विदेशी कलाकारांना भूमिका देण्यात आल्या. पण या कलाकारांना प्रेक्षकांनी कधीच फारशी पसंती दर्शवली नाही. तरीही ही क्रेझ कमी झाली नाही.

आता दिग्दर्शक एसएस राजमौली बनवत असलेल्या एका भव्य चित्रपटामध्ये पुन्हा एकदा विदेशी कलाकार झळकणार आहेत. “आरआरआर’ नामक या चित्रपटात रामचरन तेजा आणि एनटीआर ज्युनियर मुख्य भूमिकेत आहेत. याखेरीज चित्रपटात ओलविया मॉरिस, एलिसन डुडी यांच्यासह रेस्टीवेन्सन हे तीन परदेशी कलाकार झळकणार आहेत.

तेलगू भाषेत बनणाऱ्या या चित्रपटात आलिया भट आणि अजय देवगणही महत्त्वाच्या व्यक्‍तिरेखा साकारणार असल्याचे समजते. बाहुबली’सारख्या भव्य-दिव्य चित्रपटांची मालिका बनवलेल्या राजमौली यांच्या या चित्रपटाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. या चित्रपटाचे बजेट 350 ते 400 कोटी इतके आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.