फोर्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून निदर्शने

चेन्नई – फोर्ड कंपनीने चेन्नई सह भारतातील आणखी एका कारखान्यातील उत्पादन अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तामीळनाडू सरकारने हस्तक्षेप करावा असे फोर्ड कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संघटनेने म्हटले आहे.

संघटनेतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी फोर्ड कंपनीच्या निर्णयाच्या विरोधात निदर्शने केली. या विषयावर काय भूमिका घ्यायची यासंदर्भात मुख्यमंत्री एम के स्टालिन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याचे वृत्त आहे.

फार्ड कंपनीने घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. त्यामुळे 2700 कर्मचाऱ्यावर परिणाम आहे होणार आहे. यासाठी काही पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.