‘जय श्रीराम’च्या घोषणेची जबरदस्ती; तरुणाचा निष्पाप बळी

खरसावन –  झारखंडमधील खरसावन जिल्ह्यात तरबेज अन्सारी या 24 वर्षीय तरुणाला जमावाकडून मारहाण झाली आहे. या मारहाणीत तरबेज अन्सारी या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपीस अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरबेज अन्सारी मंगळवारी आपल्या मित्रांसह जमशेदपूर येथील धतकिडि गाव येथून  मित्रांसह जात असतांना गावाकडील रस्त्यावर उभ्या जमावाने चोरीचा संशयावरुन मारहाण केली. तसेच जय श्रीराम आणि जय हनुमानच्या घोषणाही द्यायला सांगितल्या. यादरम्यान त्याचा दोन मित्रांनी पळ काढला. तरबेज अन्सारी मृत्यूनंतर त्याचा कुटूंबियांनी जमावाकडून हिंसाचार झाल्याचे माध्यमांना सांगितले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.