सक्तीने मटणाची दुकाने बंद पाडली – हिंदु सेनेच्या दोन जणांना अटक

गुडगांव – नवरात्रीचे कारण सांगून सक्तीने मटणाची दुकाने बंद करण्यासाठी दुकानदारांना धमकावल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. हे दोघेही जण हिंदु सेनेचे कार्यकर्ते आहेत. राकेश आणि प्रमोदसिंह अशी त्यांची नावे असून सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते दुकानदारांना धमकाऊन दुकाने बंद करण्यास भाग पाडत असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकूण चाळीस जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

कालच्या शनिवारी हिंदु सेनेच्या सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी शहराच्या पालम विहार, बादशहापुर, आणि ओम विहार भागातून मोर्चे काढून मटणाची सुमारे 250 दुकाने धाकदपटशा दाखवून बंद पाडली होती. दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी नवरात्रीच्या काळात मटणाची दुकाने आम्ही सुरू ठेऊ देणार नाही असा इशारा हिंदु सेनेचे अध्यक्ष रितू राज यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.