मुंबई –जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला स्थान देण्यात आले आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आलेल्या 100 खेळाडूंच्या यादीत 182 कोटी रुपये कमावणाऱ्या कोहलीला स्थान देण्यात आले आहे. या यादीत स्थान मिळवणारा कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.
कोहलीची 2019 व 2020 या दोन मोसमातील कमाई 26 मीलियन डॉलर्स म्हणजेच 182 कोटी रुपये इतकी प्रचंड असली तरीही त्याला या यादीत 66 व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. यातील 240 कोटी रुपयांची कमाई जाहिरातींच्या करारातून मिळालेली आहे.
सध्या कोहलीकडे प्युमा, ऑडी, हिरो, फिलिप्स, हिमालया, व्हिक्स व व्हॉलिनी या कंपन्यांच्या जाहिरातींचे करार आहेत. तसेच कोहली व त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा यांचा ई-कॉमर्स कंपनी मंत्रा यांच्याशीही करार आहे. यातूनच प्रत्यक्ष क्रिकेटमधून मिळणाऱ्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त कमाई जाहिरातींमधून त्याने केली आहे.