पुणे : … यासाठी गुन्हे पोलीस निरीक्षकाला केले निलंबित !

पुणे : लॉकडाऊन कालावधीत पकडलेली ट्रॅव्हल सोडण्यासाठी एका व्यक्तीमार्फत 50 हजार रुपये घेतल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

लॉकडाउन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी 14 जुलैला सुखसागरनगर येथे ट्रॅव्हल पकडली होती. त्यानंतर तडजोडीअंती पोलीस निरीक्षक खोकले यांनी सुखदेव भिमदान चारण (वय 37, काकडे वस्ती, कोंढवा) याच्यामार्फत 50 हजार घेतल्याची तक्रार नरसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय 23, रा. नांदेवडगाव ता. हवेली) यांनी केली होती.  त्यानुसार खोकले यांची खात्यातंर्गत चौकशी करण्यात आली. त्यामध्ये ते दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी खोकले यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.