राज्यात तिसऱ्यांदा झाली राष्ट्रपती राजवट लागू

नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर आज राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू झाली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या शिफारशीवर शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.

दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्रात दोनदा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 1980 रोजी महाराष्ट्रात सक्तीने राष्ट्रपती राजवट लागू झालेली होती. ही राजवट तब्बल 112 दिवस चालली. नव्याने विधानसभेच्या निवडणूका होऊन नवे मुख्यमंत्री निवडले जाईपर्यंत राष्ट्रपती राजवट कायम होती.

1980 नंतर तशी परिस्थिती तब्ब्ल 34 वर्षांनी 28 सप्टेंबर 2014 रोजी राज्यात पुन्हा एकदा आली. 2014 च्या विधानसभा निवडणूकांची धामधुम सुरू असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. आणि आज 12 नोव्हेंबर 2019 रोजी तिसरी राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे महाराष्ट्रात अनेक प्रशासकीय बदल होण्याची शक्यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here