शिरूरमध्ये महिला सुरक्षा धाव मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरूर (प्रतिनिधी)- महिला सुरक्षा कायम राहिल. महिलांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी शिरूर येथील विविध संघटनांनी आयोजित केलेल्या महिला सुरक्षा धाव मॅरेथॉन स्पर्धेत चालण्याच्या स्पर्धेत साठ वर्षांच्या शकुंतला घावटे या महिलेने सर्वांचे लक्ष वेधून घेऊन सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे.
येथील आदिशक्ती महिला मंडळ, ऍक्टीव्ह सोशल ग्रुप, वारसा फाऊंडेशन, रामलिंग महिला उन्नती संस्था व युवा स्पंदन या संस्थाच्या वतीने शिरूर महिला फिटनेस मॅरेथॉन 2019 चे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा वैशाली वाखारे नगरसेविका उज्ज्वला बरमेचा, रोहिणी बनकर, मनीषा कालेवार, संगीता मल्लाव, स्पर्धच्या आयोजक शशीकला काळे, कामिनी बाफना, मंजुश्री थोरात, राणी कर्डिले, प्रियांका धोत्रे यांच्या हस्ते भगवा झेंडा फडकावून मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली. पहाटेच्या गुलाबी थंडीत पाचशेहून अधिक महिला उत्स्फूर्तपणे नगरपरिषद नवीन कार्यालय ते विद्याधाम प्रशाला यादरम्यान धावल्या. ज्येष्ठ महिलांचा स्पर्धतील सहभाग स्पर्धचे वैशिष्ट्ये ठरले.
विद्याधाम प्रशाला शिक्रापूर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नगराध्यक्षा वाखारे, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव बाबासाहेब चोरमले, मुख्याध्यापक अनिल तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. माजी नगराध्यक्षा रवींद्र ढोबळे, रामलिंगचे सरपंच नामदेवराव जाधव, जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफणा, शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल काळे, मनसे चित्रपट सेनेचे जिल्हाध्यक्ष चेतन धोत्रे, वारसा जिजाऊ फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्राची दुधाने, आशिष चोपडा, “राणीसाहेब’ क्रिएशन साडी सेंटरचे विशेष सहकार्य लाभले.
वयोगटानुसार विजेते
14 ते 17 वयोगटप्रथम क्रमांक श्रुती परेश रोटे, द्वितीय क्रमांक- पूजा अर्जुन राठोड, 18 ते 25 वयोगट प्रथम क्रमांक- कोमल विलास भोगावडे, द्वितीय क्रमांक- श्रावणी दत्तात्रय सरोदे, 26 ते पस्तीस वयोगट प्रथम क्रमांक प्रिया लोकेश बिराजदार, द्वितीय- पल्लवी जगताप, 32 ते 60 वयोगट प्रथम- जुई सुरेश पराड, द्वितीय- कविता थोरात. वॉकेथॉन वयोगट 35 ते 45 वयोगटातील प्रथम क्रमांक ज्योती हांडे, द्वितीय क्रमांक वैशाली खाबिया. वयोगट 40 ते साठ वयोगट : प्रथम- शकुंतला घावटे, द्वितीय- जयश्री गेहलोत.