नवी दिल्ली – देशात सलग दहाव्या दिवशी दैनंदिन नवीन रूग्णसंख्या 3 लाखांहून कमी झाल्याची नोंद झाली आहे. काल दिवसभरात देशात 2 लाख 08 हजार 921 दैनंदिन नवीन रूग्णांची नोंद केली गेली.
तर सक्रीय रूग्णांची एकूण संख्या देखील कमी होऊन आता 24 लाख 95 हजार 591 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्या 91,191 इतकी घटली आहे. गेल्या 24 तासांत 2,95,955 रुग्ण कोविडमुक्त झाल्याची नोंद केली गेली. रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आणखी वाढून 89 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
गेल्या 24 तासांत 22 लाख 17 हजार 320 चाचण्या करण्यात आल्या असून एकाच दिवसात करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या या सर्वाधिक चाचण्या आहेत, लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत देशभरात राबविल्या जाणाऱ्या कोविड -19 लसींच्या एकूण मात्रांनी 20 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.