राज्यात सलग सातव्या दिवशी 2 हजारहून अधिक करोनाबाधितांची भर

मुंबई -महाराष्ट्रात शनिवारी नवे 2 हजार 608 करोनाबाधित आढळले. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 इतकी झाली आहे. दरम्यान, राज्यातील करोनाबाधितांमध्ये सलग सातव्या दिवशी 2 हजारहून अधिक संख्येची भर पडली.

राज्यात सर्वांधिक करोनाबाधित मुंबईत आढळले आहेत. त्या शहरात करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या आता 28 हजार 817 इतकी झाली आहे. राज्यात करोनाने आणखी 60 बाधितांचा बळी घेतला. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 1 हजार 577 झाली आहे. एकट्या मुंबईत करोना संसर्गामुळे आतापर्यंत 949 बाधित दगावले आहेत.

राज्यभरात आणखी 821 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यातील 13 हजार 404 बाधित करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील सक्रिय बाधितांची संख्या आता 32 हजार 209 इतकी आहे. राज्यभरात आतापर्यंत 3 लाख 48 हजारहून अधिक रूग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या.

सध्या राज्यभरात 4 लाख 85 हजारहून अधिक लोकांना घरगुती विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर 33 हजार 545 जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×