आमदारांना मनविण्यासाठी काँग्रेसतर्फे ‘हे’ जेष्ठ नेते बंगळुरूकडे रवाना

मुंबई – लोकसभा निवडणुकांमधील निराशाजनक पराभवानंतर काँग्रेसला आता आणखी एक मोठा धक्का बसला असून कर्नाटकात जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारमधील १४ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस आघाडीतील आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे आता कर्नाटकातील सरकारच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अशातच आता काँग्रेसतर्फे आपल्या पक्षाच्या आमदारांना त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्याची जबाबदारी जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मल्लिकार्जुन खर्गे सध्या बंगळुरूकडे रवाना झाले असून त्यांनी याबाबत एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना, “राजीनामा दिलेल्या आमदारांपैकी बहुतेक आमदार हे खुपपूर्वीपासून काँग्रेस पक्षाशी जोडले गेलेले असून मला विश्वास आहे की ते आमच्या सोबतच राहतील. मी साध्याबंगळुरूकडे रवाना होत असून तेथे गेल्यावरच नक्की परिस्थिती कशी आहे याबाबत माहिती मिळेल.”

Mallikarjun Kharge: Many of the MLAs who want to leave Congress have been associated with the party for a long time. I’ve faith that they’ll stay with us & support the party. I’m going to Bengaluru. I’ll make further comments after looking at the ground situation there.#Karnataka pic.twitter.com/2EgSY8gC0Y

— ANI (@ANI) July 6, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.