पुढील पाच काय तर अनेक वर्ष आमचंच सरकार – रामदास आठवले

नवी दिल्ली – लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांचे रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीतून अभिनंदन केले. आपल्या कवितेतून त्यांनी बिर्ला यांचे स्वागत केले. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. आठवले म्हणाले की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे मोठा जनाधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेने बहुमतात निवडून दिले आहे. पुढील पाच काय तर अनेक वर्ष आमचंच सरकार असेल असं सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आम्ही तुम्हाला सत्तेत येऊच देणार नाही, असं आपल्या शैलीत काँग्रेसला सांगितलं.

रामदास आठवले अध्यक्ष ओम बिर्ला यांना आपल्या अनोख्या शैलीतून अभिनंदन करतांना म्हणाले की,’बिर्ला हे अनुभवी व्यक्ती आहेत. ते कधीच हसत नाहीत. परंतु मी तुम्हाला सभागृहात हसवणार असल्याचे सांगत आठवले यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानातील कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांची १७ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी तत्काळ आपला पदभार स्वीकारला.’

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बिर्ला यांच्या कार्याची ओळख करुन देत त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच सभागृहात लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांचे नाव सुचवले होते. त्यांचा नावाच्या प्रस्तावाला एआयडीएमके, वायएसआर कॉंग्रेस, आणि बिजू जनता दल या पक्षांनीहीं पाठिंबा दिला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×