मुस्लिम ड्रायव्हरसाठी ‘त्या’ अधिकाऱ्याने ठेवला रोजा 

मुंबई – महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एका हिंदू अधिकाऱ्याने बंधुत्वाचे महान उदाहरण समोर ठेवले आहे. बुलढाणामधील विभागीय वन अधिकारी संजय एन. माळी यांनी धर्माच्या भिंती तोडत रोजा ठेवला आहे. विशेष म्हणजे हा रोजा संजय माळी यांनी आपले मुस्लिम ड्रायव्हरच्या वतीने ठेवला आहे. संजय माळी दररोज पूर्ण श्रद्धेने रोजा ठेवतात. आणि नियमांनुसार सहरी आणि इफ्तार करतात.

संजय माळी यांनी म्हंटले कि, ६ मे रोजी त्यांनी ड्रायव्हरला रोजाविषयी विचारले होते. ड्रायव्हरने सांगितले कि, प्रकृती खराब असल्याने मी रोजा ठेवू शकत नाही. अशा स्थितीत संपूर्ण दिवस उपवास ठेवू शकत नाही. यावर संजय यांनी स्वतः पुढाकार घेत ड्रायव्हरच्या वतीने रोजा ठेवणार असल्याचे सांगितले. माळी म्हणाले, असे केल्याने सांप्रदायिक सद्भाव वाढीस लागतो. प्रत्येक धर्म चांगल्या गोष्टी शिकवत असल्याच्या त्यांना विश्वास आहे.

https://twitter.com/ani_digital/status/1134315316941533184

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)