नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) महिला बायकर्सचे पथक पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. हे पथक संचलनात चित्तथरारक कसरती करून सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहेत.
#WATCH Delhi: Central Reserve Police Force (CRPF) women bikers contingent practice for Republic Day Parade 2020 at Rajpath. pic.twitter.com/81Llcxewbx
— ANI (@ANI) January 21, 2020
या पथकामध्ये 65 महिला पोलिसांचा समावेश करण्यात आला आहे. 90 मिनिटे चालणाऱ्या या संचलनाच्या कार्यक्रमात 350 सीसी क्षमतेच्या रॉयल एनफिल्ड मोटारसायकलींवर हे पथक ऍक्रोबॅटिक कसरती दाखवणार आहे.
दोन दिवसांपूर्वी हे पथक संचलनाच्या सरावात सहभागी झाले होते. यावेळी संचलनात राफेल फायटर प्लेन, अपाचे हेलिकॉप्टरही पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे महिला सीआरपीएफच्या कवायती पहायला सर्वच उत्सुक आहेत.