बेल्ह्यातील ओढे पहिल्यांदाच खळाळले

रब्बी हंगाम चांगला जाण्याची शेतकऱ्यांना आशा

अणे – जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात पावसाने शनिवार (दि. 5) दमदार हजेरी लावल्याने यंदा प्रथमच बेल्हे परिसरतील ओढे, नाले खळखळून वाहू लागल्याने बळीराजा आनंदित झाला आहे.

जुन्नरच्या पूर्व भागातील बोरी, राजूरी, बेल्हे, निमगावसावा, बांगरवाडी, जाधववाडी, तांबेवाडी, यादववाडी, अणे, गुंजाळवाडी, पेमदरा या परिसरांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वीज व ढगांच्या गडगडाट पावसाने शनिवारी दुपारी सुरुवात केली होती. पावसाबरोबर वाराही असल्याने काही भागात पिकाचे नुकसान झाले आहे.

पावसाअभावी अणे पठार भागातील काही ठिकाणचे पीक गेले असले तरी रब्बी हंगाम चांगला जाईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.