तापसी पन्नूला “लूप लपेटा’ नावाचा एक जबरदस्त सिनेमा मिळाला आहे. त्यामध्ये तापसीबरोबर प्रथमच राज भसीन दिसणार आहे. जर्मन सिनेमा “रन लोला रन’चा हिंदी रूपांतर असलेला “लूप लपेटा’ एक थ्रिलर कॉमेडी असणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी 29 जानेवारीला रिलीज करण्याच्या दृष्टीने याच वर्षी त्याचे सर्व शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनही पूर्ण केले जाणार आहे.
या सिनेमाव्यतिरिक्त तापसीकडे “थप्पड’ नावाचा आणखी एक जबरदस्त सिनेमा असणार आहे. “थप्पड’ याच महिन्याच्या अखेरीस रिलीज होणार आहे. यामध्येही तापसीबरोबर फार ग्लॅमर नसलेला अनुभव सिन्हा हिरो म्हणून असणार आहे. तापसी आणि अनुभव सिन्हा यापूर्वी “मुल्क’मध्ये एकत्र होते.
या दोन सिनेमांच्या नंतर तापसीचा “हसीन दिलरुबा’ येणार आहे. त्यामध्ये तापसीबरोबर विक्रांत मैसी दिसणार आहे. त्यापाठोपाठ क्रिकेटपटू मिताली राजचा बायोपिक “शाबाश मिठू’मध्ये तापसी असेल. हा सिनेमाही पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे, पण या सिनेमात तिच्याबरोबर कोणी हिरो म्हणून दिसणार असेल. त्यामुळे लागोपाठ ग्लॅमर नसलेल्या हिरोंबरोबर काम करण्याची वेळ तापसीवर आली आहे.