विधेयकाचे दहन केल्याने जिग्नेश मेवाणी निलंबित

अहमदाबाद: गुजराथ विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना संपूर्ण सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. सोमवार पासून या विधानसभा अधिवेशनाला सुरवात झाली आहे. या अधिवेशनात स्टॅच्यू ऑफ युनिटी डेव्हलपमेंट विधेयक मांडण्यात येणार होते. परंतु मेवाणी यांनी त्यापूर्वीच या विधेयकाची प्रत विधानभवन परिसरात जाळली आहे.

गुजरात विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच सोमवारी उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे संविधान दिनानिमित्त भाषण देत असताना मेवाणी यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर अली आहे.

दरम्यन संविधानाच्या मुद्द्यावरुन मेवाणी यांनी विधानसभेत आक्रमक भाषण केलं होतं, यावेळी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि विधानसभा अध्यक्षांना संविधानाच्या मुद्द्यावरील विसंगतीवरुन प्रश्न विचारले होते. गुजरात विधानसभा सभागृहातील तीन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संविधान दिन साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मुख्यमंत्री रुपाणी यांनी ठेवला होता. त्यास, मेवाणी यांनी विरोध केला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी सभागृहातील बेशिस्त आणि गैरवर्तुणुकीचा दाखला देत जिग्नेश मेवाणी यांना 3 दिवसांसाठी निलंबित केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.