सहा वर्षांत प्रथमच थेट परकीय गुंतवणुकीत घट

नवी दिल्ली: सहा वर्षांत प्रथमच 2018-19 या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणुकीत एक टक्‍क्‍यांची घट झाली आहे. या वर्षात भारतामध्ये 44.37 अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली. दूरसंचार, औषधे, रिअल्टी या क्षेत्रात गुंतवणूक कमी झाली असल्याचे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने म्हटले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात विक्रमी 44 .85 अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली होती.

या अगोदर 2012-13 या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणूक 36 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 22.42 अब्ज डॉलरवर गेली होती. त्यानंतर मात्र ही गुंतवणूक वाढत गेल्यानंतर गेल्या वर्षी ही गुंतवणूक कमी झाली आहे. भारतात सिंगापूर, मॉरिशस, जपान, नेदरलॅंड, ब्रिटन अमेरिका, जर्मनी, सायप्रस आणि फ्रान्समधून बरीच गुंतवणूक होते. आता नवे सरकार ही गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.