Sadhna S Nair | लेफ्टनंट जनरल साधना एस नायर आणि त्यांचा मुलगा स्क्वाड्रन लीडर तरुण नायर यांच्यासाठी प्रजासत्ताक दिन 2025 खूप खास बनला आहे. आज 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लेफ्टनंट जनरल साधना एस नायर आणि त्यांचा मुलगा तरुण नायर यांचा सन्मान करणार आहेत. साधना आणि तरुण ही भारताच्या इतिहासात एकाच समारंभात राष्ट्रपतींचा सन्मान मिळवणारी पहिली आई-मुलाची जोडी आहे.
लेफ्टनंट जनरल साधना एस नायर, व्हीएसएम यांना एव्हीएसएम प्रदान करण्यात येईल. त्याचवेळी त्यांचा मुलगा स्क्वाड्रन लीडर तरुण नायर याला शौर्य चक्र प्रदान करण्यात येणार आहे. लेफ्टनंट जनरल साधना एस. नायर यांना त्यांच्या सेवेबद्दल अति विशिष्ट सेवा पदक प्रदान केले जाईल, तर त्यांचा मुलगा स्क्वाड्रन लीडर तरुण नायर यांना भारतीय वायुसेनेतील शौर्य आणि धैर्यासाठी वायु सेना पदक (शौर्य) प्रदान करण्यात येईल.
केंद्रीय सशस्त्र दलातील 93 सैनिकांना शौर्य पुरस्कार
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र दलातील 93 सैनिकांना शौर्य पुरस्कार देण्यास मान्यता दिली. यामध्ये 2 कीर्ती चक्र (1 मरणोत्तर) आणि 14 शौर्य चक्र (3 मरणोत्तर) समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे साधना यांचे वडील आणि भाऊही भारतीय हवाई दलात डॉक्टर होते. त्यांचा मुलगा हवाई दलातफ्लाइट लेफ्टनंट म्हणून तैनात आहे.
लेफ्टनंट जनरल साधना नायर कोण आहे?
लेफ्टनंट जनरल साधना नायर यांनी त्यांचे शालेय शिक्षण सेंट मेरी कॉन्व्हेंट, प्रयागराज येथून केले. त्यांनी सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथून शैक्षणिक रेकॉर्डसह पदवी प्राप्त केली आणि डिसेंबर 1985 मध्ये आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली. साधना नायर यांनी फॅमिली मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी AIIMS, नवी दिल्ली येथे वैद्यकीय माहिती शास्त्राचा दोन वर्षांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम केला.
लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांना 31 जुलै 2024 रोजी लष्कराच्या वैद्यकीय सेवांचे महासंचालक बनवण्यात आले. या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये हवाई दलात एअर मार्शल पदावर पदोन्नती दिल्यानंतर साधना यांना हॉस्पिटल सर्व्हिसेसचे महासंचालक (डीजी) बनवण्यात आले.
एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणाऱ्या साधना या हवाई दलातील दुसऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांच्या आधी एअर मार्शल पद्मा बंदोपाध्याय यांनी ही कामगिरी केली होती. पद्मा यांची 2002 मध्ये एअर मार्शल पदावर नियुक्ती झाली होती.
तरुण नायर यांचा शौर्य पुरस्कार देऊन गौरव
मिग-29 स्क्वॉड्रनचे फायटर पायलट फ्लाइट लेफ्टनंट तरुण नायर यांना त्यांच्या असामान्य शौर्य आणि कौशल्यासाठी ‘वायू सेना पदक (शौर्य)’ प्रदान करण्यात येणार आहे. 12 मार्च 2024 रोजी अवघड उड्डाण करताना मिग-29 विमानात अनेक तांत्रिक त्रुटी असूनही त्यांनी विमान सुरक्षितपणे उतरवले होते.
हेही वाचा: