मोजक्याच मंडळींना प्रवेश : जुन्नरमधील कार्यक्रम रद्द
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांची माहिती : कार्यक्रम संपल्यानंतर इतर शिवभक्तांना गडावर प्रवेश
जुन्नर – करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वांनी गर्दी टाळून यंदाचा शिवजयंती उत्सव साधेपणाने; परंतु उत्साहात साजरा साजरी करावी.
किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत साजरा होणारा यावर्षीचा शासकीय शिवजयंती उत्सव शासकीय नियम आणि अटींच्या अधीन राहून साधेपणाने उत्साहात साजरा केला जाणार आहे. तर मोजक्याच मान्यवरांना शिवनेरी गडावर प्रवेश दिला जाणार आहे. गडावरील मुख्य शासकीय कार्यक्रम संपल्यावर अंदाजे दुपारी 12 नंतर इतर शिवभक्तांना गडावर सोडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे इतिहासात प्रथमच शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 10) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार अतुल बेनके, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी किल्ले शिवनेरी गडावर भेट देऊन पाहणी केली आणि शासकीय शिवजयंती उत्सव 2021 च्या नियोजनाबाबात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी सारंग कोडलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गट विकास अधिकारी शरद माळी, सभापती विशाल तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष राजू डूबल, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, शरद लेंडे, अंकुश आमले, पांडुरंग पवार, सभापती विशाल तांबे, नगराध्यक्ष शाम पांडे, पुरातत्व विभागाचे बाबासाहेब जंगले, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे,मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश आगम, नगरसेवक भाऊ कुंभार,पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, भाऊ देवाडे उपस्थित होते.