अभिनेता अक्षयकुमार हा पहिल्यांदाच एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात कृती सेननची बहीण नुपूर सेनन देखील असणार आहे. अक्षयकुमार आणि नुपूरने गायक बी प्राकसाठी नवीन गाणे शूट केले आहे. हे रोमॅटिंक गाणे असणार आहे.
यापूर्वी अक्षयकुमारने चित्रपट “केसरी’करता “तेरी मिट्टी’ यासाठी आवाज दिला होता. या म्युझिक व्हिडिओमध्ये या दोघांशिवाय पंजाबी गायक एमी विर्क देखील दिसणार आहे. सोशल मीडियावर अक्षयकुमार आणि नुपूरचे फोटो व्हायरल होत आहेत. यापूर्वी नुपूर ही बहिणीसमवेत एका जाहिरातीत दिसली होती.
दरम्यान, कृती आणि अक्षयकुमार हे लवकरच हाऊसफुल्ल 4 मध्ये दिसतील. या चित्रपटात बॉबी देवल, रितेश देशमुख, कृती खरबंदा, पूजा हेगडे, राणा दग्गुबत्ती, चंकी पांडे आणि बोमन इराणी यांची प्रमुख भूमिका आहे. दिवाळीत हा चित्रपट रिलिज होणार आहे.