नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत कोविडचे नवीन 8964 रूग्ण आढळून आले आहेत त्यामुळे देशातील एकूण कोविडग्रस्तांची संख्या 3 कोटी 45 लाख 96 हजार 776 इतकी झाली आहे.
दरम्यान देशातील कोविडची सक्रिय बाधितांची संख्या एक लाखाच्या आत आली आहे. तब्बल 547 दिवसांनंतर ही स्थिती उद्भली आहे. गेल्या 24 तासांत 267 कोविड बाधितांचा मृत्यू झाल्याने कोविडमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 4 लाख 69 हजार 247 इतकी झाली आहे.
देशात सध्या कोविडच्या ऍक्टिव्ह केसेस 99 हजार 23 इतक्या असून एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण आता केवळ 0.29 टक्के इतके राहिले आहे. देशातील कोविडचा रिकव्हरी रेट 98.36 टक्के इतका झाला आहे.