नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख के सिवन यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना भारत स्वतःचे अवकाश स्थानक उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली आहे.
भारताची ही महत्वाकांक्षी मोहीम गगनयान मोहिमेची पुढची पायरी असणार आहे.
या महत्वाकांक्षी योजनेबाबत अधिक माहिती देताना इस्रो प्रमुख के सिवन म्हणाले की, “भारत स्वतःचे अवकाश स्थानक उभारण्याच्या तयारीत असून यासाठी भारताच्या मानवी अवकाश मोहिमेनंतर देखील आपल्याला गगनयान मोहीम सुरु ठेवायला लागणार आहे.”